'सकाळ इंडिया फाउंडेशन' तर्फे भारतात किंवा भारताबाहेर पीएच डी साठी अथवा पदव्युत्तर शिक्षण घेणारा भारतीय विद्यार्थ्यांना चालीस हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ज्या भारतीय पदविधारक विद्यार्थ्यांना भारताबाहेरील विद्यापीठाकडून किंवा संशोधन संस्थेकाडून किमान एका वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी (२०१०-२०११) प्रवेश दिल्याचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल किंवा जे पदवीधर भारतातील विद्यापीठ अथवा राष्ट्रीय संशोधन करीत असतील आणि ज्या विद्यार्थ्यांना पीएच डी साठीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल, असेच विद्यार्थी या शिष्यवृत्ती साठी पात्र समजले जातील. ही रक्कमेची परतफेड दोन वर्षात करावयाची आहे.
वृत्तपत्र व्यवसायाचे पदव्युत्तर शिक्षण घेणारा तसेच वरील पात्रता अट पूर्ण करणारा आणि शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यास दहा हजार रुपये परत न करण्याच्या अतिवर दिले जातील.
अर्जाचा नमूना ३१ में २०१० पर्यंत पाठवला जाईल किंवा कार्यालयातून सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० पर्यंत मिळेल. भरलेले अर्ज १५ जून २०१० पर्यंत स्वीकारले जातील.
कार्यालयाचा पत्ता : कार्यकारी सचिव, सकाळ इंडिया फाउंडेशन, सकाळ कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे - ४११००२
फोन नंबर : ०२० - २४४०५८९५, २४४०५८९४
ईमेल : sakalindiafoundation@esakal.com
विद्यार्थ्यांनी प्रवेश मिलाल्याचा पत्राची झेरोक्स प्रत तसेच दहा रुपये, पोस्टाचे तिकीट लावलेले स्वत:च्या पत्त्याचे पाकिट (अकरा बाय चोवीस सेंटीमीटर) विनंती अर्जसोबत पाठवावा.
(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे - २१ फेब्रुवारी २०१०)
No comments:
Post a Comment