उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 30 जानेवारी२०१० ला शासन निर्णयाद्वारे नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होने अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २७ अगस्त २००९ व २३ सप्टेम्बर २००९ च्या अधिसुचनेचा उल्लेख करीत राज्यातील सर्व विद्यापीठे तसेच सलग्न महाविद्यालये आणि संस्थामधिल बिगर नेट-सेट अधिव्याख्याते, सहाय्यक अधिव्याख्याते यांना नेट-सेट असणे अनिवार्य केले आहे.
तसेच सध्या जे बिगर नेट-सेट अधिव्याख्याते व सहाय्यक अधिव्याख्याते कार्यरत आहेत त्यांना ३१ डिसेम्बर २०११ पर्यन्तच्या दोन वर्षाच्या कालावधीत प्राप्त असलेल्या चार संधीत ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
सहावा वेतन आयोगही लागू केला आहे, परन्तु नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक केले आहे.
(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे - १८ फेब्रुवारी २०१०)
No comments:
Post a Comment